झेविअर्समध्ये आदित्य ठाकरेंना आमंत्रित केल्यानं विद्यार्थी नाराज

आदित्य ठाकरे यांना आमंत्रित केल्याने माजी विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केलीयं.

Updated: Oct 5, 2018, 11:18 AM IST
झेविअर्समध्ये आदित्य ठाकरेंना आमंत्रित केल्यानं विद्यार्थी नाराज  title=

मुंबई : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला निमंत्रित केल्यानं वाद निर्माण झालाय.  सेंट झेविअर्स महाविद्यालने १५० व्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्ताने वर्षभर महाविद्यालयात अनेक सोहळे आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्याची माहिती देण्यासाठी बोधचिन्हाच्या अनावरणासाठी आदित्य ठाकरे यांना आमंत्रित केल्याने माजी विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केलीयं. तसं नाराजीचं पत्र त्यांनी झेवियर्स महाविद्यालय प्रशासनाला दिलं आहे.

झेविअर्सतून शिक्षण घेतलेल्या आणि विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या माजी विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाने केलं होतं.  आदित्य ठाकरे हे झेविअर्सचे माजी विद्यार्थी असल्याने ते या कार्यक्रमाला ते आमंत्रित होते.

अभ्यासक्रमाला विरोध 

2010 साली मुंबई विद्यापीठाने रोहिंग्टन मिस्त्री यांच्या 'सच अ लॉंग जर्नी' या पुस्तकाचा पाठयक्रमात समावेश केला होता. पुस्तकात मुंबईची बदनामी केली असल्याचा आक्षेप उपस्थित करीत आदित्य ठाकरे यांनी या अभ्यासक्रमाला विरोध केला होता. 

युवासेनेने केलेल्या आंदोलनाचे हिंसक पडसाद झेविअर्स बाहेर उमटले होते. तत्कालीन प्राचार्य फादर फ्रेजर मास्कऱ्हेनान्स यांनी ठाकरे यांच्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली होती.

यापार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांना बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमासाठी आमंत्रित करणं काही माजी विद्यार्थ्याना रुचलेलं नाही.

त्यांनी आपल्या नाराजीचे पत्र महाविद्यालय व्यवस्थापनाला दिलंय.

या पत्राला आता कॉलेज प्रशासन उत्तर देणार का ? हा प्रसंग कशाप्रकारे हाताळला जाणार ? हे येणाऱ्या दिवसात कळेलच.