Worli Hit And Run Case: मिहिर शाहाच्या अटकेनंतर जयवंत वाडकर संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले...

Worli Hit And Run Case Mihir Shah's Arrest : वरळी हिट अ‍ॅंड रन प्रकरणात मिहिर शाहाला अटक झाल्यानंतर मृत महिलेचे काका आणि अभिनेते जयवंत वाडकर यांची संतप्त प्रतिक्रिया...

दिक्षा पाटील | Updated: Jul 9, 2024, 04:58 PM IST
Worli Hit And Run Case: मिहिर शाहाच्या अटकेनंतर जयवंत वाडकर संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले... title=
(Photo Credit : Social Media)

Worli Hit And Run Case: वरळीमध्ये घडलेल्या हिट अॅंड रन प्रकरणानंतर संपूर्ण मुंबई हादरली असताना. त्या प्रकरणात सतत काही ना काही माहिती समोर येत होती. या अपघातात 45 वर्षीय कावेरी नाखवा (Kaveri Nakhwa) यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती प्रदीप नाखवा वय 50 वर्ष हे गंभीर जखमी आहेत. तर या प्रकरणात आरोपी हा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहाचा (Mihir Shah) सहभाग असल्याचं समोर आलं असताना. आता मिहिरला शहापुरमधून अटक करण्यात आली आहे. मिहीरला अटक केल्यानंतर या प्रकरणात अभिनेता जयवंत वाडकर यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. जयवंत यांनी या प्रकरणात त्यांची प्रतिक्रिया देण्याचं कारण म्हणजे कावेरी नाखवा या त्यांच्या पुतणी होत्या. 

हिट अॅंड रन प्रकरण घडल्यानंतर मिहिरला अटक करण्यात आली होती. त्यांना काल जामिन मंजूर झाला तर फरार अरोपी असलेल्या मिहिर शाहला शहापुरमधून अटक करण्यात आली. याविषयी 'झी 24 तास'शी बोलताना जयवंत वाडकर म्हणाले, "माझा पोलिसांवर विश्वास आहे. ते माझे मित्र आहेत आणि राजकारणी वगैरे यांचा हस्तक्षेप काढला तर 24 तासात मुंबईमध्ये एकही क्राईम होणार नाही. आता त्याला पकडलेलं आहे. तर आता मला वाटतंय की योग्य ती कारवाई करावी. फास्ट फॉर्वडवर ही केस घ्यावी. त्याच्यावर 302 हे कलमाखाली त्याला अटक झाली पाहिजे. अशा निर्दयी मानसाला इतक्या क्रुरतेनं बॉडी 3 किलोमीटर लांब घेऊन जाऊन. ती बाजूला करायची. गाडी बाहेर काढायची पुन्हा तिच्यावरून गाडी न्यायची. त्या मुलानं इतकं घाणेरडं वर्तन केलंय. हे दारुच्या नशेतच केलेलं आहे. इतके दिवस बाहेर का ठेवलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर आता मेडिकल केल्यानंतर त्यानं मद्यपान केलं होतं की नाही हे कळणार नाही. बाकीची जी माहिती आहे जी समोर आली आहे की तो बारमध्ये होता. तो बारचा मालक देखील सतत त्याच्याकडेच बघून बोलत होता की त्यानं फक्त एकच बियर प्यायली. असं वाटतंय की त्याला ते सांगण्यात आलं होतं. त्यांनी काय काय केलं. इतकं कोणी लक्ष ठेवतं का? हे सगळं खोटं रचलेलं आहे. त्याला अटक केल्यानंतर आता त्याला मॅक्झिमम कोठडी व्हावी." 

पुढे मिहिर शाहच्या वडिलांना अटक झाल्यानंतर त्यांना जामिन मंजूर झाल्यानंतर त्यावर विचारण्यात येताच जयवंत म्हणाले, "कायदा हा असा बदलायलाच हवा. हिट अॅन्ड रनचा हा कायदा जो आहे. हा कायदा बदलायला हवा. यांना जामिन दिला नाही पाहिजे. या मोठ्या लोकांना पैशाचा, सत्तेचा माज असलेल्या या लोकांना पोलिसांच्या ताब्यात देताना तेव्हा पोलिस काय आहेत हे त्यांना कळतं. यात साजिश होती नक्कीच काही काळ होतं. पोलिस सगळं काही शोधून काढतील असं मला वाटतं. मला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. प्रशासनावर माझा अजिबात विश्वास नसला तरी पोलिसांवर माझा विश्वास आहे." 

हेही वाचा : Worli Hit And Run प्रकरणातील मृत महिला 'या' ज्येष्ठ अभिनेत्याची पुतणी; 'फाशीची शिक्षा द्या..' आक्रोश करत त्यांची मागणी

फोटोकाढून फाईन देण्यावर बोलताना पुढे मिहिर म्हणाले, "फोटो काढून 500 रुपये 1000 रुपये दंड याला काहीही अर्थ नाही. आधी पोलिस अडवायचे त्यामुळे त्यांची दहशत होती."