मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आता वर्क फॉर्म होम देण्यात आलं आहे. मुंबईत कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून शिक्षण विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रूग्णसंख्या कमी होत असताना २९ ऑक्टोबरला आदेश काढून ५० टक्के शिक्षकांना आळीपाळीने शाळेत उपस्थित राहण्यास सांगितले गेले होते. पण आता पूर्वीसारखे घरातून ऑनलाईन पद्धतीने मुलांना शिकवले जाणार आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अजूनही वाढत आहे. त्यामुळे मुंबईतील शाळा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. शिक्षण विद्यार्थ्यांना घरातून व्हाट्सअॅप , झूम, टेलिग्राम या माध्यमातून ऑनलाईन धडे देत आहेत.
Brihanmumbai Municipal Corporation Education Dept issues an order asking all schools in its jurisdiction to discontinue 50% rotational attendance rule from March 17.Teachers will take their classes in 'Work From Home' pattern with help of e-learning platforms until further orders
— ANI (@ANI) March 16, 2021
शैक्षणिक वर्ष संपत आलं आहे. पण शाळा सुरु होण्याची शक्यता अजूनही कमीच आहे. कारण राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट असल्याची चर्चा आहे. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आता मुंबई महापालिकेने सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जितका धोका विद्यार्थ्यांना आहे तितकाच दूरदूरवरून प्रवास करून येणाऱ्या शिक्षकांना देखील आहे, तसेच यामुळे त्यांच्या कुटुंबालाही धोका आहे.