कांदिवलीत लोकलसमोर येऊन महिलेची आत्महत्या

 चर्चगेटहून बोरीवलीच्या दिशेने येणाऱ्या धिम्या लोकलसमोर या महिलेने स्वतःला झोकून दिलं.

Updated: Aug 9, 2018, 11:26 PM IST

मुंबई : मुंबईतल्या कांदिवली रेल्वे स्थानकावर एका महिलेने लोकल समोर येऊन आत्महत्या केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. बुधवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमाराला फलाट क्रमांक एक वर चर्चगेटहून बोरीवलीच्या दिशेने येणाऱ्या धिम्या लोकलसमोर या महिलेने स्वतःला झोकून दिलं. या महिलेची ओळख अजून पटलेली नसून, पोलीस याबाबत तपास करत आहेत.