Ramdev Baba's Statement on Women Clothes: योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा रामदेव बाबांनी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. महिला कपडे घातल्या नाहीत तरी चांगल्या दिसतात असं विधान रामदेव बाबा यांनी केले आहे. ठाण्यात (Thane) योगा (Yoga) एका कार्यक्रमात रामदेव बाबा बोलत होते. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला देखील उपस्थित होत्या.
'तुम्ही साडी, सलवार सुटमध्येही चांगल्या दिसता आणि माझ्यासारखे कपडे नाही घातले तरीही चांगल्या दिसता, असे विधान रामदेव बाबा यांनी केले आहे. "तुम्ही साडीमध्येही चांगल्या दिसतात, सलवार सूटमध्ये चांगल्या दिसता, माझ्या प्रमाणे काही नाही घातलं तरी चांगल्या दिसता," असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले आहे.
या कार्यक्रमात महिलांसाठी योगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र योगानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांना त्यांनी योगासाठी घातलेले ड्रेस बदलता आले नाहीत. योगा कार्यक्रमानंतर महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. याबाबत बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, "साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसाहिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता. महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्यासारखे काही नाही घातलं तरी चालते."
यााआधी उत्तर प्रदेशात एका कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा यांनी बॉलीवूड कलाकारांवर टीका केली होती. सध्या संपूर्ण बॉलिवूड ड्रग्जच्या विळख्यात आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. "सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार ड्रग्सचे सेवन करत आहेत. सध्या सर्व सिनेसृष्टी, बॉलिवूड हे ड्रग्जच्या विळख्यात अडकले आहे. यापूर्वी सलमान खानचा मुलगा ड्रग्ज घेताना पकडला गेला होता, याची तुम्हाला कल्पना असेलच. या प्रकरणी त्याला तुरुंगातही जावे लागले होते," असे रामदेव बाबा म्हणाले. मात्र यानंतर आजूबाजूच्या लोकांनी सलमान नाही तर शाहरुखचा मुलगा तुरुंगात गेला होता, असे सांगितल्यावर त्यांनी सुधारणा केली.