कल्याण स्थानकात महिलेने दिला जुळ्यांना जन्म

एक्सप्रेसने प्रवास करत होती महिला 

कल्याण स्थानकात महिलेने दिला जुळ्यांना जन्म  title=

 मुंबई : मुंबई हे असं शहर आहे जिथे रोज काही ना काही वेगळं घडतच असतं. एका महिलेने कल्याण स्थानकात जुळ्यांना जन्म दिला आहे. 30 वर्षाची ही महिला एलटीटी-विशाखापट्टणम एक्सप्रेसमधून प्रवास करत होती. प्रवासातच प्रसुतीकळा सुरू झाल्यामुळे एक्सप्रेस कल्याणमध्येच थांबवण्यात आली. सुमारे तीस मिनीटे ट्रेन कल्याण स्थानकात थांबवण्यात आली. बाळ बाळंतिणीला ट्रेनमधून उतरवण्यात आलं.

घाटकोपर येथील शेख सलमा तबस्सुम ही ३० वर्षीय गरोदर महिला रविवारी सकाळी एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेसमधून प्रवास करत होती. त्यांना प्रसूती वेदना होत असल्याची माहिती रेल्वेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर एक्स्प्रेस कल्याण स्थानकातच थांबवण्यात आली. कॉन्स्टेबल नीलम गौर, सुरेखा कदम यांच्यासह रेल्वे पोलीस आणि डॉक्टरांचं पथक कल्याण स्थानकात पोहोचले. एक्स्प्रेसमध्येच सलमा यांनी जुळ्यांना जन्म दिला. त्यानंतर सलमा आणि बालकांना पुढील उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

नवजात बालकांची आणि सलमाची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी ही कल्याण स्थानकात आलेल्या एक्सप्रेसमध्ये घडली आहे.