मुंबई : मुंबईतल्या ओशिवरा भागात काल रात्री एका उच्चभ्रू इमारतीच्या गच्चीवरून एका २२ ते २५ वर्षांच्या युवतीने उडी मारून आत्महत्या केली आहे. पर्ल पंजाबी असं या मुलीचं नाव आहे. सिनेसृष्टीत अपेक्षित यश न मिळाल्याने पर्ल पंजाबी या युवतीने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं आहे. या मुलीचे घरात आईशी सतत वाद सुरू असल्याचीही माहिती पुढे येत आहे.
Mumbai: A woman allegedly committed suicide by jumping off the terrace of her apartment in Oshiwara late last night. More details awaited. #Maharashtra pic.twitter.com/lw0gr8lqgp
— ANI (@ANI) August 30, 2019
पोलिसांच्या माहितीनुसार मुलीची मानसिक स्थितीही तितकीशी चांगली नव्हती. याआधीही तिने २ वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. काल रात्री १२ वाजता घरात पुन्हा वाद झाल्यावर तिने रागाच्या भरात आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.