मुंबई : लोकसभा निवडणुकीचा प्रचारात आता खरी रंगत येत आहे. भाजपने काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांचे उत्पन्न पाच वर्षांत ५५ लाखांवरून ९ कोटी कसे वाढले, असा प्रश्न भाजपकडून विचारण्यात आला आहे. याला काँग्रेसने तेवढेच जोरदार उत्तर दिले आहे. तुमची सत्ता आहे ना, मग तुम्ही चौकशी का करत नाही. तसेच भाजपच्या नेत्यांच्या मामत्तेची तुम्ही चौकशी करणार का? ३०० आणि ९०० कोटी रुपयांनी भाजपच्या नेत्यांच्या संपत्तीत कशी वाढ झाली आहे, याचे उत्तर भाजप देणार आहे का, असा प्रतिप्रश्न काँग्रेसने भाजपला केला आहे. त्यामुळे मालमत्ता वाढीमुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
भाजपच्या उत्तर मध्य मुंबईतील खासदार पूनम महाजन यांनी २००९ च्या प्रतिज्ञापत्रात एकूण मालमत्ता १२.०८ कोटी दाखवली होती. २०१४ साली मालमत्ता वाढून १०५ कोटीची झाली होती. म्हणजेच जवळपास ५ वर्षांत ९०० पटीने मालमत्ता वाढते कशी, भाजप याची चौकशी करणार का? तसेच भाजप आमदार राम कदम यांची २००९ मध्ये १३ कोटी, २०१४ मध्ये ३९ कोटी रुपये म्हणजेच तीनशे टक्के वाढली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांची २०१४ च्या निवडणुकीत १२६ कोटी, तर २०१७ मध्ये २१० कोटी रुपयांनी वाढली. ही भर कशी पडली याचे उत्तर भाजपकडून मिळाले पाहिजे, असे प्रति आव्हान काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपला दिले आहे.
- राहुल गांधी यांचे उत्पन्न पाच वर्षांत ५५ लाखांवरून ९ कोटी कसे वाढले, असा प्रश्न भाजपचे नेते विचारत आहेत
- तुमचं सरकार पाच वर्ष आहे, मग आयटी डिपार्टमेंटने चौकशी का केली नाही
- हे आरोप जाणीवपूर्वक केले जातायत
- आता आम्ही भाजपाला काही प्रश्न विचारतो
- भाजपच्या उत्तर मध्य मुंबईतील खासदार पूनम महाजन यांनी २००९ च्या प्रतिज्ञापत्रात एकूण मालमत्ता १२.०८ कोटी दाखवली होती
- २०१४ साली मालमत्ता वाढून १०५ कोटीची झाली होती
- जवळपास ५ वर्षात ९०० पटीने मालमत्ता वाढते कशी
- भाजप याची चौकशी करणार का?
- राम कदम २००९ साली १३ कोटी, २०१४ साली ३९ कोटी, तीनशे टक्के वाढली
- भाजप आमदार प्रसाद लाड यांची २०१४ च्या निवडणुकीत १२६ कोटी, तर २०१७ च्या २१० कोटी वाढली
- ही भर कशी पडली याचं उत्तर भाजपकडून मिळालं पाहिजे
- पूनम महाजन यांची मालमत्ता एकीकडे वाढतेय तर दुसरीकडे अडीच कोटी धनादेश न वाटल्याचे प्रकरण समोर येतंय
- नैतिकतेचे डोस पाजणे भाजपने बंद करावे
- आमचे सरकार २०१४ साली गेले तेव्हा२२ टक्के लोक दारिद्र्य रेषेखाली होते
- युपीए सरकार असताना आम्ही १४ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणले
- नव्याने काँग्रेसने केलेली घोषणा ही देशातील गरीबांना फायदेशीर होईल.