मुंबई : विधीमंडळात सत्ताधारी आणि विरोधक आमदारांमध्ये राजकीय सामना नेहमीच रंगत असतो. मात्र आज चक्क विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार एकमेकांविरोधात फुटबॉल सामन्यासाठी मैदानात उतरले होते.
विधान भवन परिसरातल्या मैदानावर सभापती इलेव्हन विरूद्ध अध्यक्ष इलेव्हन असा फुटबॉल सामना रंगला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामन्याची कमेंट्री केली.
तर क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सामन्यात पंचाची भूमिका बजावली. सर्वच पक्षांच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी आवर्जून प्रेक्षकाची भूमिका बजावली.