...आणि मोठा अपघात टळला!

हार्बर मार्गावरील रबाळे आणि घणसोली स्टेशनदरम्यान मोठा अपघात शुक्रवारी होता होता टळला. या मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर अॅल्युमिनियमची शिडी आडवी ठेवण्यात आली होती. या मार्गावरुन रेल्वे धावली असती तर कदाचित मोठा अपघात झाला असता. मात्र मोटरमनच्या सतर्कतमुळे हा अपघात टळला. 

Updated: Aug 12, 2017, 06:58 PM IST
...आणि मोठा अपघात टळला! title=

मुंबई : हार्बर मार्गावरील रबाळे आणि घणसोली स्टेशनदरम्यान मोठा अपघात शुक्रवारी होता होता टळला. या मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर अॅल्युमिनियमची शिडी आडवी ठेवण्यात आली होती. या मार्गावरुन रेल्वे धावली असती तर कदाचित मोठा अपघात झाला असता. मात्र मोटरमनच्या सतर्कतमुळे हा अपघात टळला. 

१०-१२ वर्षांच्या तीन मुलांनी ही शिडी रेल्वे ट्रॅकवर ठेवल्याचे तपासातून समोर आले. या तिघांनी ही शिडी कोपरखैरणे येथील एका हॉटेलमधून चोरली. ही शिडी विकल्यानंतर अंमली पदार्थांसाठी पैसे मिळवायचे असे त्यांनी ठरवले होते. 

मात्र ही शिडी जड असल्याने त्यांनी तिचे दोन तुकडे करायचे ठरवले. यासाठी त्यांनी ती शिडी रेल्वे रुळावर ठेवली. रबाळे आणि घणसोली स्टेशनदरम्यानच्या ट्रॅकवर त्यांनी ही शिडी रुळावर ठेवली. 

यावेळी ट्रेनमधील मोटरमनने ती रुळांवर आडवी ठेवलेली शिडी पाहिली आणि ट्रेन थांबवली. त्यानंतर तात्काळ कंट्रोल रुमला फोन करुन आरपीएफला ही माहिती देण्यात आली. यावेळी त्या तीन मुलांपैकी एकाला ताब्यात घेण्यात यश आले. तर दोन मुले पळून गेली. याप्रकरणी रेल्वे कायद्यानुसार कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.