Anil Deshmukh : छगन भुजबळ जेलबाहेर आल्यावर मंत्री झाले; अनिल देशमुख यांचे शरद पवार काय करणार?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ(Chagan Bhujbal) आणि खासदार सुप्रिया सुळे(MP Supriya Sule) यांनी अनिल देशमुखांचे स्वागत केले. राष्ट्रवादीने अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत तर केले पण त्यांच्या पुढचं राजकीय भवितव्य काय असेल याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. छगन भुजबळ जेलमधून आल्यावर पुन्हा मंत्री झाले. आता अनिल देशमुख यांच्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

Bollywood Life | Updated: Dec 28, 2022, 09:51 PM IST
Anil Deshmukh  : छगन भुजबळ जेलबाहेर आल्यावर मंत्री झाले; अनिल देशमुख यांचे शरद पवार काय करणार?   title=

Anil Deshmukh Released From Jail : राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) अखेर जेलमधून बाहेर आले आहेत. कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना अटक झाली होती. या प्रकरणी तब्बल 14 महिने ते आर्थर रोड जेलमध्ये होते. अनिल देखमुख यांच्या स्वागतासाठी आर्थर रोड जेल राष्ट्रवादीच्या नेत्यांची फौज उभी होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ(Chagan Bhujbal) आणि खासदार सुप्रिया सुळे(MP Supriya Sule) यांनी अनिल देशमुखांचे स्वागत केले. राष्ट्रवादीने अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत तर केले पण त्यांच्या पुढचं राजकीय भवितव्य काय असेल याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. छगन भुजबळ जेलमधून आल्यावर पुन्हा मंत्री झाले. आता अनिल देशमुख यांच्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

अनिल देशमुख जेल बाहेर आल्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया

सत्तेचा दुरुपयोग कसा होतो याचे अनिल देशमुख हे उत्तम उदाहरण आहे. न्यायालयाने दिलेला निकाल हा अनिल देशमुखांवर अन्याय करणाऱ्यांना सुबुद्धी देण्यासाठी आणि त्यांच्या धोरणात बदल करण्यासाठी उपयुक्त ठरेल ही अपेक्षा असं शरद पवार म्हणाले. न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट म्हटलय की यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही. आधी 100 कोटींचा आरोप करण्यात आला. चार्ज शीटमधे ही रक्कम साडेचार कोटी दाखवण्यात आली आणि फायनल चार्ज शीटमधे ही रक्कम एक कोटी दाखवण्यात आली. कोर्टाने म्हटलं की एका सुसंस्कृत आणि कर्तुत्ववान नेत्याला तेरा महिने चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवलं. न्यायपालिकेने न्याय दिला याचे समाधान आहे. तपास यंत्रणांच्या या गैरकारभाराची माहिती एकत्रित करुन मी आणि संसदेतील आणखी काही ज्येष्ठ सहकारी देशाचे गृहमंत्री आणि शक्य झाल्यास देशाच्या पंतप्रधानांना भेटणार आहोत. आमच्या सहकार्यावर  जी वेळ आली ती इतरांवर येऊ नये यावर चर्चा करणार. मनी लाँड्रीग संबंधी कायद्यात बदल करण्याची आम्ही मागणी करत नाहियेत तर त्याबद्दल आम्ही संसदेत चर्चा करणार असल्याचेही शरद पवारांनी सागितले.

अनिल देशमुख यांची राजकीय कारकिर्द

राज्यात कुठल्याही पक्षाची सत्ता असली तरी मंत्रीमंडळातील स्थान निश्चित असणाऱ्या मौजक्या नेत्यांपैकी अनिल देखमुख एक आहेत. अनिल देशमुख हे विदर्भातील एक वजनदार नेते आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोलमधील वाढविहिरा हे त्यांच मुळ गाव. 1995 मध्ये अपक्ष आमदार म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. यावेळी सत्तेत आलेल्या शिवसेना-भाजपला पाठिंबा दिल्याने त्यांना मंत्रीपद मिळाले. 1999 मध्ये त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यानंतर त्यांनी अनेक मंत्री पद भूषवली. राष्ट्रवादीमधील पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये त्यांना स्थान मिळाले. इतकचं नाही तर ते शरद पवार यांच्या जवळचे नेते बनले.

अटक झाल्यानंतर शरद पवार अनिल देशमुख यांच्या पाठिशी उभे राहिले

मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला होते.  या100 कोटीच्या कथित वसुली प्रकरणात 2021 साली नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अनिल देशमुख यांना अटक झाली होती. अटक झाल्यानंतरही राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांसह शरद पवार देखील अनिल देशमुख यांच्या पाठीशी उभे राहिले. सव्वा वर्ष देशमुख जेलमध्ये होते. अखेर ते जामीनावर बाहेर आले आहेत. आता देखील शरद पवार त्यांच्यासाठी भूमिका घेणार आहेत. आता अनिल देशमुख यांचे राजकीय भवितव्य देखील शरद पावर यांच्याच हातात आहे. यामुळे आता शरद पवार त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवतात याकडे देखील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

जेल मधून आल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळाले

अनिल देखमुख यांच्या पूर्वी छगन भुजबळ यांना कथित दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी अटक झाली होती. त्यांना मार्च 2016मध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली. भुजबळ देखील तब्बल दोन वर्ष आर्थर रोड जेलमध्ये होते. अखेर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात भुजबळ यांना क्लीन चीट मिळाली.  भाजीविक्रेता ते महापौर असा छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास आहे. शिवसेनेची साथ साडून त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. ते शरद पवार यांच्या जवळचे नेते मानले जातात. यामुळेच तर जेलमधून बाहेर आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्री पदाची लॉटरी लागली.