नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर काय होणार फैसला?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांवर आरोपाची राळ उडविली. तर, शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनीही किरीट सोमय्या यांना दलाल संबोधले. तर त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केला.

Updated: Feb 28, 2022, 03:49 PM IST
नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर काय होणार फैसला? title=

मुंबई : शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या याच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केला. या आरोपानंतर प्रत्युत्तर म्हणून 'ठाकरे सरकारने खुशाल चौकशी करावी, आम्ही न्यायालयात जाणार नाही,' असे आव्हान माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिले होते.

नील सोमय्या यांची मुलुंड पोलिसांनी सुमारे दोन तास चौकशी केली. मात्र, त्यापूर्वीच नील सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबई सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी धाव घेतली होती.

संबंधित न्यायालयाचे न्यायाधीश शुक्रवारी उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे नील सोमय्या यांच्या अर्जावर सुनावणी झाली नाही. या अर्जावर आज सुनावणी होणार होती.

आज मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश दीपक भागवत यांच्यासमोर नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. ज्येष्ठ वकील ऍड. अशोक मुंदरगी यांनी नील सोमय्या यांच्यासाठी युक्तीवाद केला.

ऍड. अशोक मुंदरगी यांनी यक्तीवाद केल्यानंतर न्यायाधीश दीपक भागवत यांनी या अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. या अर्जावर न्यायाधीश उद्या निर्णय देणार आहेत. 
 
नील सोमय्या यांनी निकॉन इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जमिनी बाजारभावापेक्षा कमी दरात मिळवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. त्यासंदर्भातील कागदपत्रे राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलिसांकडे दिली होती.