Uddhav Thackeray on Jansangh : भारतीय जनसंघ आणि स्वातंत्र्याचा संबंध काय? - उद्धव ठाकरे यांचा सवाल

बीकेसी येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि संघ यांच्यावर टीका करताना संघ आणि स्वातंत्र्याचा संबंध काय? असा थेट सवाल केलाय. 

Updated: May 14, 2022, 09:07 PM IST
Uddhav Thackeray on Jansangh : भारतीय जनसंघ आणि स्वातंत्र्याचा संबंध काय? - उद्धव ठाकरे यांचा सवाल title=

मुंबई : देवेंद्र फडणवीस याना एक विचारायचं आहे. तुमचा पक्ष जेव्हा नव्हता, आमचा ही नव्हता. पण, तुमची मातृसंस्था संघ आहे तिला आता दोन, तीन वर्षांनी शंभर वर्ष पूर्ण होतील.

स्वातंत्र्यपूर्व काळास संघ अस्तित्वात होता. पण, एकदाही संघ देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरलेला नाही. असेल बातमी तर दाखवा. तुमचा आणि स्वातंत्र्याचा संबंध काय? संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा सुरु होता, त्या लढ्यातही नव्हतात. त्या लढ्यात जनसंघ म्हणून होतात. 

त्यावेळी शिवसेनाही नव्हती पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझे काका श्रीकांत ठाकरे, माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांना मदत करत होते. तेव्हा जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरु होता त्यातले पहिले पाच सेनापती होते, त्यातले एक म्हणजे प्रबोधनकार ठाकरे होते.

संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली पण यातून पहिले बाहेर पडले ते म्हणजे जनसंघ आणि तेही जागेवरुन. म्हणजे भाजपचा बापच फुटला. तेव्हापासून मुंबईचे लचके तोडण्याचा यांचा मनसूबा आहे हा वेळीच लक्षात घ्या.