CM Uddhav Thackeray Live : 'बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई महाराष्ट्राशी तोडण्याचा डाव, पोटातलं आता ओठावर आलं.'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बुलेट ट्रेनवर (Bullet Train) केंद्र सरकारवर टीका केली आहे. बीकेसी येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेन म्हणजे मुंबईला तोडण्याचा डाव असल्याचं म्हटलं आहे. बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरलो आहे. अनेक विषयांवर बोलायचं आहे. अशी सुरुवात सभेत बोलताना त्यांनी केली.

Updated: May 14, 2022, 08:39 PM IST
CM Uddhav Thackeray Live : 'बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई महाराष्ट्राशी तोडण्याचा डाव, पोटातलं आता ओठावर आलं.' title=

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बुलेट ट्रेनवर (Bullet Train) केंद्र सरकारवर टीका केली आहे. बीकेसी येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेन म्हणजे मुंबईला तोडण्याचा डाव असल्याचं म्हटलं आहे. बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरलो आहे. अनेक विषयांवर बोलायचं आहे. अशी सुरुवात सभेत बोलताना त्यांनी केली.

बुलेट ट्रेनवरुन टीका

'सभा सुरु आहे येथे ते बुलेट ट्रेन आणणार आहेत. पण ही बुलेट ट्रेन कोणी मागितली. कोण जाणार त्या बुलेट ट्रेन ने. हा मुंबई तोडण्याचा डाव चालला आहे. फडणवीसांना विचारायचं आहे. मातृसंस्था संघ 100 वर्षाची होत आहे. पण संघ एकदाही स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरला नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ही नव्हता.'

'पोटातलं आता ओठावर आलं आहे. आम्हाला मुंबई ओरबाडण्यासाठी नकोय, मुंबईवर जेव्हा आपत्ती येते तेव्हा शिवसैनिक आधी जावून जातो. कुटुंबाची परवा न करता तो दुसऱ्याच्या मदतीसाठी धावत जातो.'