Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर सध्या सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी सोमवारीही गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्री हा ब्लॉक घेण्यात येणार असून रात्री 11 ते मंगळवार सकाळी साडेपाच या कालावधीत मेजर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे जवळपास 12 लोकलच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
साडेसहा तासांचा हा ब्लॉक पाचव्या तसेच अप जलद मार्गावर घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान रात्री ११ ते ३:३० या कालावधीत बोरिवली आणि अंधेरी अप जलद लोकल अप धिम्या मार्गावर चालविण्यात येणार आहे. तसेच काही लोकल रद्द वा शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत. तसंच, पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळं हजारो प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.
सोमवारी रात्री 10.24 वाजता चर्चगेट-बोरीवली लोकल मालाडपर्यंतच धावेल. तर रात्री 10.44 वाजता विरार-अंधेरी जलद एसी लोकल बोरीवलीपर्यंतच धावणार आहे. रात्री 11.55 वाजता अंधेरी ते भाईंदर एसी लोकल रात्री 11.25 वाजता बोरीवलीहून चालवण्यात येणार आहे. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी पहाटे 4.05 वाजता वांद्रे-बोरीवली लोकल गोरेगावपर्यंत धावेल. ही लोकल पहाटे 4.38 वाजता गोरेगाव- चर्चगेट जादा धिमी लोकल म्हणून चालवण्यात येणार आहे. सकाळी 8.12 वाजता बोरीवली-विरार लोकल नालासोपाऱ्यापर्यंत चालवण्यात येईल. तर, सकाळी 9.05 वाजता विरार-बोरिवली धिमी लोकल बोरिवली-अंधेरी-वांद्रे-दादर-मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर चर्चगेटपर्यंत धावेल.
सकाळी 9.19 वाजता चर्चगेट-बोरीवली लोकल चर्चगेटवरुन मुंबई सेंट्रल-दादर-वांद्रे-अंधेरी-बोरिवलीदरम्यान जलद मार्गावर नालासोपाऱ्यापर्यंत धावेल. पहाटे 4.32 वाजता बोरिवली-चर्चगेट धिमी एसी लोकल अंधेरी-वांद्रे-दादर-मुंबई सेंट्रल-चर्चगेटपर्यंत जलद मार्गावर धावेल. पहाटे 4.10 भाईंदर-चर्चेगट जलद लोकल चर्चेगेपर्यंत धिम्या मार्गावर धावणार असून पहाटे 4.45 वाजता भाईंदर -चर्चगेट लोकल धिम्या मार्गावर धावेल. सकाळी 7.25 विरार-वांद्रे धिमी लोकल चर्चगेटपर्यंत चालवण्यात येणार आहे. सकाळी 9.23 वाजता चर्चगेट-विरार एसी लोकल चर्चगेट-मुंबई सेंट्रल-दादर-वांद्रे-अंधेरी-बोरिवली-भाईंदर-वसई रोड-विरारदरम्यान जलद मार्गावर विरारपर्यंत धावेल.