Election Result | भाजपचं कौतुक केलं पाहिजे; संजय राऊत यांचा खोचक टोला

तामिळनाडू, पुदुच्चेरी वगळता कुठेही सत्तांतर होणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Updated: May 2, 2021, 10:05 AM IST
Election Result | भाजपचं कौतुक केलं पाहिजे; संजय राऊत यांचा खोचक टोला title=

मुंबई : पश्चिम बंगालच्या निवडणूका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. सत्ताधारी ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉंग्रेसला हरवण्यासाठी भाजपने खुप मेहनत घेतलीये. त्यांचं कौतुक केलं पाहिजे अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तामिळनाडू, पुदुच्चेरी वगळता कुठेही सत्तांतर होणार नाही, भाजपने पश्चिम बंगालमध्ये खुप मेहनत घेतली आहे. त्यांचं कौतुक केलं पाहिजे. खुद्द पंतप्रधानांसह देशातील सर्व भाजपचे महत्वाचे नेते पश्चिम बंगालमध्ये डेरा टाकून बसले होते. सर्व केंद्रीय मंत्री, यंत्रणा ममताजींच्या विरोधात भाजपने पणाला लावली आहे. परंतु तरीही तृणमुलची सत्ता पश्चिम बंगालमधून जाणार नाही. असा खोचक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

देशात सध्या कोरोनाकडे लक्ष देणं जास्त गरजेचं असून पंतप्रधान प. बंगालच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये बंगालमध्ये व्यस्त असल्याने देशाच्या कोरोना परिस्थितीतकडे दूर्लक्ष झालं. तसंच लोकांचे कोरोनामुळे अतोनात हाल होत आहेत. याला निवडणूक आयोग जबाबदार आहे. असं न्यायालयानेही म्हटलंय, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.