Mumbai Water Supply : मुंबईकरांनो...पाणी जपून वापरा, 'या' तारखांना पाणीपुरवठा राहणार बंद!

Mumbai water supply shut down: जानेवारीच्या अखेरीस रोजी सकाळी 10 पर्यंत भांडुप संकुल येथील जल शुद्धीकरण केंद्रात काही तातडीची कामे हाती घेण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट आलंय.

Updated: Feb 6, 2023, 09:30 PM IST
Mumbai Water Supply : मुंबईकरांनो...पाणी जपून वापरा, 'या' तारखांना पाणीपुरवठा राहणार बंद! title=
Mumbai Water Supply

Mumbai Water Supply : काही दिवसांपूर्वी मुंबईच्या (Mumbai News) काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा 8 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 पर्यंत पाणीपुरवठा बंद (Water supply will be shut off) ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला देण्यात येतोय. (Water supply will be shut off in Mumbai from February 8 to February 9, 2023 till 10 am mumbai news)

महानगरपालिकेतर्फे (BMC) 8 फेब्रुवारी, रोजी ट्रॉम्बे उच्च स्तरिय जलाशयातील इनलेट्स व्हॉल्व्ह (Inlets valve) बदलण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. सदर दुरुस्ती कामामुळे बुधवारवारी 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून गुरुवार सकाळी 10 वाजेपर्यंत पश्चिम विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद (Water supply off) राहील.

आणखी वाचा - MHADA : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाची 700 घरं

जानेवारीच्या अखेरीस रोजी सकाळी 10 पर्यंत भांडुप संकुल येथील जल शुद्धीकरण केंद्रात काही तातडीची कामे हाती घेण्यात आली होती. या कामामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात 24 तास पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता.

कोणत्या भागात पाणीपुरवठा बंद?

टाटानगर, गोवंडी स्टेशन मार्ग, देवनार म्युनिसिपल वसाहत (कॉलनी), गोवंडी, लल्लूभाई इमारत, जॉन्सन जेकब मार्ग (ए, बी, आय, एफ सेक्टर), एसपीपीएल इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर, देवनार गाव रस्ता, गोवंडी गाव, व्ही. एन. पुरव मार्ग, बीकेएसडी मार्ग, दूरसंचार कारखाना परिसर, मंडाला गाव, मानखुर्द नौदल, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गाव, गोवंडी स्टेशन रोड, सी-सेक्टर, डी-सेक्टर, ई-सेक्टर, जी-सेक्टर, एच-सेक्टर, जे-सेक्टर, के-सेक्टर, कोळीवाडा ट्रॉम्बे, कस्टम रोड, दत्त नगर, बालाजी मंदीर मार्ग, पायलीपाडा चिता कॅम्प ट्रॉम्बे, देवनार फार्म रोड, बोरबादेवी नगर, बी.ए.आर.सी. फॅक्टरी, घाटला अमर नगर, मोती बाग, खारदेव नगर, वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ वसाहत (कॉलनी), लाल डोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लाल वाडी, मैत्री पार्क, अतूर पार्क, सुमन नगर, साईबाबा नगर.