मुंबई : मोजोस बिस्ट्रो रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आणि...
पुन्हा रूफ टॉप रेस्टॉरंटला प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रेस्टॉरंटमध्ये मुलभूत सुविधांचा अभाव असल्याचं समोर आलं. अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी तब्बल 6 तासांचा कालावधी लागला. आप्तकालीन दरवाजाचा वापर न करता आल्यामुळे गुदमरून 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. आता अशी माहिती समोर आली आहे की, या मोजोस रेस्टॉरंटचे काही शेअर गायक शंकर महादेवन यांच्या मोठ्या मुलाने म्हणजे सिद्धार्थ महादेवनच्या नावे होते. म्हणजे मालक म्हणून सिद्धार्थ महादेवन या दुर्घटनेला जबाबदार होता का? असा प्रश्न विचारला जात होता.
जुलै महिन्यात या मोजोस बिस्ट्रो रेस्टॉरंटचे उद्धाटन झाले. यावेळी बॉलिवूड आणि मराठीतील अनेक मान्यवर कलाकार उपस्थित असल्याचं समोर येत आहे. या रेड कार्पेटच्यावेळी अभिनेता बोमन इरानी, तौफीक कुरैशी, गायक अभिजीत सावंत, गायक राहुल वैद्य, अभिनेता सचिन पिळगांवकर, गायक शान यासारखी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
शंकर महादेन यांच्यावर मुंबईकरांनी भरभरून प्रेम केलं. प्रत्येकाला त्यांच्याबद्दल एक वेगळी आपुलकी आहे. पण त्यांच्या मुलाच्या रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडली आणि त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला. एक जबाबदार नागरिक आणि रेस्टॉरंटचा मालक म्हणून तेथील सुरक्षेची जबाबदारी ही महादेवन यांची होती. आता पुन्हा एकदा रेस्टॉरंटच्या सुरक्षेकडे केलेला काना डोळा अधोरेखित झाला आहे.