मुंबई : गुरूवारी रात्री लोअर परेल येथील मोजो बिस्ट्रो रेस्टॉरंटला भीषण आग लागली.
या आगीत 15 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी आहेत. कमला मिल परिसरातील मोजो बिस्ट्रो हे रूफ टॉप रेस्टॉरंटला आग लागल्याने ही दुर्घटना घडली. या रेस्टॉरंटमध्ये मुलभूत सुविधा नसल्याचे समोर आले. आपतकालीन दरवाज्यासमोर प्रचंड सामान असल्यामुळे तेथून निघन अशक्य झाल्यामुळे गुदमरून लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने पुन्हा एकदा रेस्टॉरंटची सुरक्षा ऐरणीवर असल्याचं स्पष्ट होतंय.
या मोजोमध्ये गायक शंकर महादेवन यांच्या मुलाचे काही शेअर्स असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे रेस्टॉरंट आतून कसं दिसत होतं. हे पाहणं साऱ्यांसाठी उत्सुकतेचं होतं. मोजो बिस्ट्रो हे रेस्टॉरंट आतून कसं दिसायचं पाहा या व्हिडिओतून....
असं दिसायचं Mojo's Bistro
कमला मिल परिसरात हे मोजो बिस्ट्रो रेस्टॉरंट आहे. रूफ टॉप असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये वेगळं बार काऊंटर होतं. त्याचप्रमाणे आपण या व्हिडिओत पाहू शकतो यामध्ये लाकडाचा अधिक वापर केलेला दिसत आहे. या रूफ टॉपवर हुक्का पार्लर देखील होता. मध्ये एक प्रकारचं बार काऊंटर आणि आजूबाजूला सिटिंग अरेजमेंट असल्याचं आपल्याला दिसत आहे. मोजोमध्ये लाकडाप्रमाणेच प्लास्टिकचा देखील अधिक वापर केलेला दिसत आहे. मोजोमध्ये पार्टीशन करून बसण्याची व्यवस्था देखील होती. रूफ टॉप असल्यामुळे येथे रात्रीचा एक वेगळाच मोहोल असायचा. रंगीबेरंगी लाईटमुळे मोजो आकर्षक वाटत असे. आणि याच कारणामुळे अनेक तरूण येथे आकर्षित होत असतं.
हा व्हिडिओ Curly Tales चा आहे. हा व्हिडिओ 29 मे 2017 रोजी पब्लिश केलेला आहे. यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओत मोजो बिस्ट्रो रेस्टॉरंट आतून नेमकं कसं आहे हे दाखवण्यात आलं आहे.