'विश्वास'घाताची सीआयडी चौकशी होणार, वायकरांची घोषणा

एसआरए गैरव्यवहारप्रकरणी निवृत्त सीईओ विश्वास पाटलांची सीआयडीमार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत घोषणा केलीय. 

Updated: Mar 13, 2018, 03:10 PM IST
'विश्वास'घाताची सीआयडी चौकशी होणार, वायकरांची घोषणा title=

मुंबई : एसआरए गैरव्यवहारप्रकरणी निवृत्त सीईओ विश्वास पाटलांची सीआयडीमार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत घोषणा केलीय. 

मात्र, विश्वास पाटलांची चौकशी करणाऱ्या कुंटे समितीची फाईल गहाळ झाल्याचा धक्कादायक खुलासा वायकरांनी केलाय. 

एसआरएच्या १३७ पैंकी ३३ फाईल्समध्ये भ्रष्टाचार केल्याचं सिद्ध झाल्याची माहितीही त्यांनी विधानसभेत दिली. या संदर्भात निर्मल नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कऱण्यात आलीय. 

तर दरम्यान विश्वास पाटील यांच्यासोबत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या चौकशीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती त्याचं काय झालं? असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय.