विरारच्या रिसॉर्टमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीचा बुडून मृत्यू

विरारच्या अर्नाळा बीच वरील निसर्ग रिसॉर्ट मध्ये पाच वर्षीय चिमुकलीचा बुडून मृत्यू झालाय.

Updated: Jun 3, 2018, 09:49 PM IST

विरार : विरारच्या अर्नाळा बीच वरील निसर्ग रिसॉर्ट मध्ये पाच वर्षीय चिमुकलीचा बुडून मृत्यू झालाय. प्राप्ती नरेश पाटील असे मृत चिमुकलीचे नाव असून ती नारंगी या गावाची रहिवाशी आहे. शनिवारी ती आपल्या कुटुंबासोबत रिसॉर्टमध्ये गेली होती. पोहत असतांना तिचा बुडून मृत्य झाला आहे.  प्राप्तीच्या जाण्याने पाटील कुटुंबियांत दुःखाचा डोंगर कोसळलाय. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.