मुंबईत आरबीआयच्या बिल्डिंगवर हेलिकॉप्टर का घिरट्या घालत होतं?

मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या २५ मजली इमारतीवर, एक हेलिकॉप्टर घिरट्या घालताना दिसलं. यानंतर काही लोक या हेलिकॉप्टरमधून या इमारतीवर उतरले.

Updated: Apr 11, 2019, 01:21 PM IST
मुंबईत आरबीआयच्या बिल्डिंगवर हेलिकॉप्टर का घिरट्या घालत होतं? title=

मुंबई : मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या २५ मजली इमारतीवर, एक हेलिकॉप्टर घिरट्या घालताना दिसलं. यानंतर काही लोक या हेलिकॉप्टरमधून या इमारतीवर उतरले. हे दृश्य पाहून स्थानिक लोकांना धक्का बसला. हेलिकॉप्टरचा हा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. मात्र कोणतीही अफवा किंवा घबराट पसरण्याआधी स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केलं आहे, की हा एक मॉकड्रीलचा भाग आहे. तेव्हा घाबरून जाण्याचं किंवा कोणतीही अफवा आल्यास, व्हॉटसअॅपवर काहीही माहिती आल्यास, ती पुढे फॉरवर्ड करू नये, असं सांगण्यात आलं आहे.

या व्हिडीओत हे हेलिकॉप्टर आरबीआयच्या बिल्डिंगवर घिरट्या घालतंय, यानंतर हे हेलिकॉप्टर हवेतच बिल्डिंगच्या वर स्थिरावतं, यानंतर एकानंतर एक असे काही जण हेलिकॉप्टरमधून दोर पकडून बिल्डिंगच्या वर उतरतात. यानंतर स्थानिकांमध्ये हा नेमका काय प्रकार आहे, यावर चर्चा सुरू झाली होती.

हे एनएसजीचे कमांडो असल्याचं आणि त्यांच्या मॉकड्रीलचा हा भाग असल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं फर्स्टपोस्टने आपल्या बातमीत म्हटलं आहे. पोलिसांनी हा एनएसजी कमांडोंच्या मॉकड्रीलचा भाग असल्याचं सांगितलं आहे. आज सायंकाळी देखील असंच मॉकड्रील पाहण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.