'छम्मा छम्मा' गाण्यावर या मुलीचे जबरदस्त ठुमके, इंटरनेट वर VIDEOचा हंगामा

 'छम्मा छम्मा' या गाण्याला जोरदार पसंती मिळत आहे.  या गाण्यावर एका मुलीने डान्स केला आहे. हा डान्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Updated: Jan 4, 2019, 09:42 PM IST
'छम्मा छम्मा'  गाण्यावर या मुलीचे जबरदस्त ठुमके, इंटरनेट वर VIDEOचा हंगामा   title=

मुंबई : हिंदी सिनेमा 'मिकी व्हायरस' आणि 'किस किसको प्यार करुं' या सारख्या सिनेमात काम केलेली अभिनेत्री एली अवराम गेल्या काही दिवसात चर्चेत आहे. तिचे एक गाणे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 'छम्मा छम्मा' या गाण्याला जोरदार पसंती मिळत आहे. उर्मिला मातोडकरचे सुपरहिट गाणे  'छम्मा छम्मा'  पुन्हा लॉन्च करण्यात आलेय. बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा रिमिक्स गाण्यांची चलती दिसून येत आहे. याआधी रणवीर सिंग आणि सारा अली खान यांच्या 'सिम्बा' सिनेमातील 'तेरे मेरे सपने' का सुपरहिट सॉन्‍ग 'आंख मारे..' हे रिमिक्स गाणे आले. आता अरशद वारसीचा सिनेमा 'फ्रॉड सइयां' मध्ये 'छम्‍मा छम्‍मा' या गाण्याचे रिमिक्स आणले गेलेय. या गाण्यावर एका मुलीने डान्स केला आहे. हा डान्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

12 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडिओ

या गाण्याने वेड लावले आहे. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गाण्यावर जो डान्स केलाय, तो पाहून नेटकरी वेडे झालेत. आतापर्यंत या व्हिडिओला 12 लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाल्यात. हा डान्स इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील एका मुलीने सादर केलेला डान्स अनेकांना पसंत पडलाय. गेल्या वर्षी 28 डिसेंबर रोजी कनिष्का टॅलेन्ट हबने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. 

हे गाणे 1998 मध्ये आलेला सिनेमा 'चायना गेट'मधील आहे. यात उर्मिला मातोडकर थिरकताना दिसून येत आहे. ऑफिशल यूट्यूबवर हे गाणे अपलोड करण्यात आले. या गाण्याला 5 कोटी लोकांनी पाहिले. एली एवराम एकदम हॉट अंदाज डान्स करताना दिसून आली.