चंद्रकांत पाटलांना तिकिटासाठी साकडं; समर्थकांकडून गाडी अडवण्याचाही प्रयत्न

विनोद तावडे यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली.  भाजपाच्या पहिल्या यादीत विनोद तावडेंचं नाव नव्हतं.

Updated: Oct 2, 2019, 04:13 PM IST
चंद्रकांत पाटलांना तिकिटासाठी साकडं; समर्थकांकडून गाडी अडवण्याचाही प्रयत्न title=

मुंबई : विनोद तावडे यांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली.  भाजपाच्या पहिल्या यादीत विनोद तावडेंचं नाव नव्हतं. त्या पार्श्वभूमीवर तावडेंनी चंद्रकांत पाटलांची भेट घेतल्याचं बोललं जातंय. भाजपाच्या दुसऱ्या यादीत तावडेंचं नाव असण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

राज पुरोहितही अस्वस्थ

भाजपाच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानं राज पुरोहितही अस्वस्थ आहेत. चंद्रकांत पाटलांच्या भेटीसाठी ते बंगल्यावर आले होते मात्र दादा नसल्याने पुन्हा परत गेले. त्यांचे कार्यकर्तेही भाजप कार्यालयाबाहेर ये जा करत आहे. 

उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांच्या समर्थकांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. 

भालेरावांच्या समर्थकांकडून गाडी अडवण्याचा प्रयत्न

भालेराव यांचे नाव पहिल्या यादीत नसून एकूणच पत्ता कट झाल्याचे म्हंटलं जात आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आज चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. 

पुण्याला निघालेल्या पाटील यांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न भालेराव समर्थकांनी केला, मात्र उपस्थित पोलिसांनी समर्थकांना दूर केलं. दरम्यान या सर्व विषयावर कोणतीही प्रतिक्रिया न देता पाटील यांनी जाणं पसंत केलं.