विधिमंडळात पहिलं पाऊल टाकणाऱ्या ठाकरेंची 'घराणेशाही विथ डिफरन्स'

अवघ्या २९ व्या वर्षी शिवसेनेच्या युवराजांना मंत्रिपदाची लॉटरी

Updated: Dec 30, 2019, 08:31 PM IST
विधिमंडळात पहिलं पाऊल टाकणाऱ्या ठाकरेंची 'घराणेशाही विथ डिफरन्स' title=

मुंबई : आदित्य ठाकरे पहिल्यांदाच निवडून आले आणि थेट कॅबिनेट मंत्री झाले. आम्ही घराणेशाही करत नाही, म्हणणाऱ्या शिवसेनेतच हे घडलंय. आदित्य ठाकरेंनी थेट कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. अवघ्या २९ व्या वर्षी आदित्य ठाकरेंना मंत्रिपदाची लॉटरी लागलीय. 

- आदित्य ठाकरे याआधी कुठल्याही संस्थेत लोकप्रतिनिधी नव्हते

- आदित्य ठाकरेंना आमदार म्हणून कामाचा पूर्वानुभव नाही

- आदित्य ठाकरे आधी आमदार म्हणून उत्तम काम करतील, 

- लोकांचे प्रश्न मांडतील, अशी अपेक्षा होती

परंतु, यातलं काहीही न करता आदित्य ठाकरे थेट कॅबिनेट मंत्री झाले. 'जी जबाबदारी दिली जाईल, ती निभावणार' असं आता आदित्य ठाकरे म्हणत आहे. 

याआधी, तामिळनाडूत करुणानिधी आणि स्टॅलिन, पंजाबमध्ये बादल पिता-पुत्र एकाच मंत्रिमंडळात होते. पण,स महाराष्ट्रात वडील मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री होण्याची ही पहिलीच वेळ... आम्ही घराणेशाही करत नाही, असं म्हणणाऱ्या आणि सत्तेतही थेट सहभागी न होणाऱ्या ठाकरेंचा एकाच मंत्रिमंडळात वडील  मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री असा हा प्रवास आहे. शिवसेनेची ही कदाचित घराणेशाही विथ डिफरन्स असेल...