व्हिडिओ : हार्बर रेल्वेमार्गावरचे ते अल्पवयीन स्टंटबाज पोलिसांच्या ताब्यात

व्हिडिओमध्ये हे दोन अल्पवयीन मुलं धावत्या रेल्वेत जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसले होते

Updated: May 14, 2019, 11:41 AM IST
व्हिडिओ : हार्बर रेल्वेमार्गावरचे ते अल्पवयीन स्टंटबाज पोलिसांच्या ताब्यात title=

मुंबई : मुंबईच्या वडाळा भागात हार्बर रेल्वे गाडीत स्टंट करणाऱ्या दोन मुलांचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. जीवघेणे स्टंट करणाऱ्या दोघांचा पोलिसांनी शोध घेतला आणि या मुलांना ताब्यात घेण्यात आलं. या मुलांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्या पालकांनाही बोलावण्यात आलं. पालकांचं आणि त्यांच्या मुलांचं दोघांचही पोलिसांनी समुपदेशन केलं तसंच पोलिसी पद्धतीने चार समजुतीच्या गोष्टीही सांगितल्या... पुन्हा असं करू नका असं बजावून या मुलांना सोडून देण्यात आलं. 

व्हिडिओमध्ये हे दोन अल्पवयीन मुलं धावत्या रेल्वेत जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसले होते. समाज माध्यमावर हा व्हिडिओ फारच कमी वेळात व्हायरल झाला. नागरिकांत यामुळे चुकीचा संदेश जाऊ नये, याची काळजी घेत पोलिसांनी तत्काळ या मुलांचा शोध सुरू केला होता. समाज माध्यमातील व्हिडिओच्या सहाय्यानं रेल्वे पोलिसांनी काही दिवसांतच या मुलांना शोधून काढलं आणि त्यांना ताब्यात घेतलं. जीआरपी वडाळाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांनी ही कामगिरी पार पाडली.