सीएसटीएम-वाशी ट्रेन निघाली वांद्रयाला

मुंबई लोकलला लाईफलाईन समाजले जाते. 

Updated: Sep 29, 2017, 11:16 AM IST
 सीएसटीएम-वाशी ट्रेन निघाली  वांद्रयाला  title=

मुंबई : मुंबई लोकलला लाईफलाईन समाजले जाते. गुरूवारी मात्र ही हार्बर रेल्वेची एक ट्रेन आपला रस्ता चुकली आणि वाशीला निघालेली ट्रेन थेट वांद्रे येथे वळवली .  

गुरूवारी रात्री ९.४९ ची सीएसटीएम -वाशी ट्रेन १५ मिनिटं उशीरा धावत होती. शिवडीपर्यंत सार्‍या स्टेशनवर ट्रेन योग्य ठिकाणी थांबली. मात्र वडाळा स्टेशनवर या ट्रेनला सिग्नल दिला जातो. त्यानुसार रूळ बदलला जातो. वडाळाहून एक मार्ग नवी मुंबईत जातो तर एका मार्गाहून हार्बर ट्रेन पश्चिम रेल्वे स्थानकांशी जोडली आहे. 

वाशीला जाणं अपेक्षित असलेली ट्रेन सिग्नल पाहून पुढे गेली मात्र ती वांद्र्याच्या दिशेला रवाना झाली. काही वेळाने ही गोष्ट मोटारमॅनच्या लक्षात आली. तेव्हा ट्रॅक चुकलेली ट्रेन किंग सर्कल स्टेशनला थांबली. तब्बल २०-२५ मिनिटांनी ही ट्रेन पुन्हा निघाली.  

चुकीचा सिग्नल मिळाल्याने लोकल ट्रेन ट्रॅक चुकल्याची माहिती मोटारमॅनने दिली आहे. पण या गोंधळात प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.