बाबो! मुख्यमंत्र्यांची सही 1 कोटीला, व्यापाऱ्याला 'या' गोष्टीचं आमिष दाखवत घातला मोठा गंडा

मुख्यमंत्र्यांसोबत माजी ओळख आहे असे ओरोपीने सांगितलं होतं

Updated: Oct 4, 2022, 04:55 PM IST
बाबो! मुख्यमंत्र्यांची सही 1 कोटीला, व्यापाऱ्याला 'या' गोष्टीचं आमिष दाखवत घातला मोठा गंडा  title=

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : वसईच्या (Vasai) वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाऱ्याला आपले सरकारचा अधिकृत परवाना देण्याच्या नावाखाली 1 कोटी 31 लाख 75 हजार 104 रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या (CM) नावाचा गैरवापर केल्याची माहिती समोर आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Vasai scam using CM fake signature of crores)

वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजावली येथील किराना व्यापारी जिग्नेश गोपानी यांना सरकारच्या ई-पोर्टलद्वारे (E-Portal) कंपनीचे परवाना (license) हवा होता. हा परवाना बनवून देण्यासाठी आरोपीने गोपानी यांना आमची मुख्यमंत्र्यांसोबत (CM) ओळख असल्याचे सांगतिले. यानंतर 24 मे 2021 ते 27 ऑगस्ट 2022 दरम्यान आपले सरकार या ई- पोर्टलद्वारे परवाना मिळवण्यासाठी  शासनाकडे विविध कारणासाठी पैसे भरण्याचे सांगून 1 कोटी 31 लाख 75 हजार 104 रुपये घेतले.

 जिग्नेश गोपानी यांनी सर्व रक्कम ऑनलाईन पध्दतीने दिली होती. मात्र पैसे देऊनही काम होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे जिग्नेश गोपानी यांच्या लक्षात आले. यानंतर जिग्नेश गोपानी यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी यात एका आरोपीला अटक केली आहे.