मुंबई : आज ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. यानिमित्तानं दरवर्षी आज 'जागतिक मराठी भाषा दिन' साजरा होतो. २४ तास डॉट कॉमच्या वाचकांना आणि झी २४ तासच्या सर्व प्रेक्षकांना या मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा. आज झी २४ तासवर दिवसभर आपण आपल्या मायबोलीचा हा सण साजरा करणार आहोत.
मराठी भाषा दिवस ' विधिमंडळच्या प्रांगणात आज साजरा केला जाणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध गायक कौशल इनामदार हे विद्यार्थ्यासह ' लाभले आम्हांस भाग्य....' या मराठी अभिमान गीताचे समूह गायन करणार आहेत. सुमारे १० च्या सुमारास होणाऱ्या या कार्यक्रमाच्या वेळी विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती, मुख्यमंत्री तसंच विधीमंडळ सदस्य उपस्थित असणार आहेत.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठीतील पहिली आणि आघाडीची वृत्तवाहिनी झी २४ तास आज उत्सव मराठीचा साजरा करत आहे. काव्य, संगीत, नृत्य, नाट्याचा आविष्कार असलेल्या या कार्यक्रमात मराठी भाषेच्या वैभवाची झलक पाहायला मिळणार आहे.
तर मराठी भाषेच्या स्थितीबद्दल ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचवार यांनी केलेलं परखड विश्लेषण आज सकाळी ९.३० आणि दुपारी ४.३० वाजता मराठी भाषिकांना ऐकता येणार आहे. तर रात्री आठ वाजल्यापासून सलग चार तास काव्य, संगीत, नृत्य, नाट्य अशी विविध कलाविष्कारासह झी २४ तासवर हा उत्सव रंगणार आहे.
जयंत सावरकर, गिरीश ओक, संजय मोने, सुकन्या मोने, शरद पोंक्षे, आनंद भाटे, नंदेश उमप, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर, प्रमोद पवार, मधुरा वेलणकर, ऋजुता देशमुख, हृषिकेश रानडे, केतकी चैतन्य, केतकी भावे-जोशी, नचिकेत लेले या कलाकारांचा या कार्यक्रमात सहभाग आहे. सुरेश खरेंची लेखणी आणि कमलेश भडकमकर यांच्या संगीत दिग्दर्शनातून साकारलेला अप्रतिम कलाविष्कार झी २४ तासवर आज रात्री उत्सव मराठीचा या कार्यक्रमात आपण जरूर पाहा.