Bjp Mumbai : भाजपकडून मोठी जबाबदारी, आशिष शेलारांसमोर मोठं आव्हान

आशिष शेलार (Ashish Shelar) यांना भाजप मुंबई (Bjp Mumbai) अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

Updated: Aug 12, 2022, 05:12 PM IST
Bjp Mumbai : भाजपकडून मोठी जबाबदारी, आशिष शेलारांसमोर मोठं आव्हान title=

मुंबई : राज्य सरकारचा अनेक दिवसांच्या विलंबानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला. यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा (Mangal prabhat Lodha) यांची वर्णी लागली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु होत्या. अखेर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आशिष शेलार (Ashish Shelar) यांना मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. (vandre west assembly constituency mla ashish shelar appointed as bjp mumbai president)

आशिष शेलारांवर जबाबदारीसह आव्हानही

पदासह अनेक जबाबदाऱ्याही येतात. आशिष शेलार यांना देण्यात आलेल्या मुंबई अध्यक्ष पदामागे अनेक राजकीय गणितं आहेत. अवघ्या काही महिन्यांवर मुंबई महापालिका निवडणुका येऊन ठेपल्या आहेत.

भाजपने एकनाथ शिंदे गटाला आपल्यासोबत घेत सत्तास्थापन केली. शिवसेनेच्या ताब्यात 25 वर्षांपासून महापालिकेची सूत्रं आहे. त्यामुळे 
आता भाजपचं मिशन मुंबई आहे.

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे जवळपास तेवढेच उमेदवार विजयी झाले होते. शिवसेनेचे सध्या 84 तर भाजपचे 82 नगरसेवक आहेत. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीत भाजपच्या जागा वाढवण्याचं आव्हान आशिष शेलार यांच्यासमोर असणार आहे. 

शेलारांनी गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने पालिकेत गैरकारभार सुरु असल्याचं म्हणत वाभाडे काढले होते. त्यामुळे आता शेलारांसमोर पालिकेत भाजपला सिंगल लार्जेस्ट पार्टी करण्याचं आव्हान असणार आहे.

संबंधित बातम्या : Bjp Maharashtra : राज्यात भाजपची नवी कार्यकारणी, या 2 दिग्ग्जांकडे मोठी जबाबदारी