केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला किती मंत्रीपदे?

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराच्या संकेताने दिल्ली दरबारी सत्ताधारी वर्तुळात चांगलीच गरमागरमी आहे. अर्थातच कोणाच्या पदरात किती दान टाकायचे हे मोदी-शहा ही दुकलीच ठरवणार असली तरी, एनडीएच्या घटक पक्षांनी मात्र दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 21, 2017, 05:56 PM IST
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला किती मंत्रीपदे? title=

मुंबई/ नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराच्या संकेताने दिल्ली दरबारी सत्ताधारी वर्तुळात चांगलीच गरमागरमी आहे. अर्थातच कोणाच्या पदरात किती दान टाकायचे हे मोदी-शहा ही दुकलीच ठरवणार असली तरी, एनडीएच्या घटक पक्षांनी मात्र दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे.

मंत्रीमंडळ विस्ताराची कुणकूण लागताच एनडीएचा घटक पक्ष शिवसेनेने दबावतंत्राचा वापर करण्यास सुरूवात केल्याचे समजते. राज्यात शिवसेना गृहमंत्रीपद तर, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदे मागत आहे, अशी सुत्रांची माहिती आहे. आता शिवसेनेच्या दबावाला किती यश मिळणर हे प्रत्यक्ष विस्तारावेळीच समजणार आहे.

दरम्यान, २०१४ मध्ये मोदींच्या मंत्रिमंडळाचा पहिल्यांदा विस्तार झाला तेव्हा, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल देसाई मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी निघाले होते. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यामुळे दिल्ली विमानतळावरून ते मंत्रीपद न स्विकारताच परत आले होते. आता नव्या विस्तारात देसाईंना संधी मिळते का ठाकरे आणखी नव्या नावाचा विचार करणार हे लवकरच समजेल.