चणे देणार पण तुमचे दात पाडणार, उद्धव ठाकरेंची टीका

मुंबईच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरेंनी महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी केलेल्या सौभाग्य योजनेवरुनही टीका केली.

Updated: Sep 30, 2017, 10:11 PM IST
चणे देणार पण तुमचे दात पाडणार,  उद्धव ठाकरेंची टीका title=

मुंबई : मुंबईच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरेंनी महागाईच्या मुद्द्यावरुन सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी केलेल्या सौभाग्य योजनेवरुनही टीका केली.

दारीद्र्य दाखवणारा उजेड पाडू नका, एका हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं असं आहे. वीज देणार, गॅस देणार आणि भाज्या महाग करणार. हे म्हणजे असं आहे की चणे देणार पण तुमचे दात पाडणार, अशा शब्दा ठाकरेंनी सरकारवर टीका केली.

तसेच शिवसेनेने महागाईविरोधात आंदोलन केलं. शिवसेनेसारखं आंदोलन कोणीच केलं नाही असही ते पुढे म्हणाले.