शिवसेनेत वादांची मालिका कायम; शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुखाची हकालपट्टी

 मुंबईचे माजी महापौर आणि ईशान्य मुंबई विभाग क्रमांक ७ चे विभागप्रमुख दत्ता दळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केलाय.

Updated: Aug 13, 2018, 09:52 AM IST
शिवसेनेत वादांची मालिका कायम; शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुखाची हकालपट्टी title=

मुंबई: शिवसेनेच्या ईशान्य मुंबई विभात वादांची मालिका सुरूच आहे. मुलुंडचे उपविभागप्रमुख जगदीश शेट्टी, शाखाप्रमुख दीपक सावंत यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यानं पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. मुखपत्र 'सामना'त आज (सोमवार,१३ ऑगस्ट) तशी घोषणा करण्यात आली आहे.

प्रदीर्घ काळानंतर पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई

अनेक वर्षानंतर शिवसेनेकडून पदाधिकारऱ्यांवर कठोर कारवाई झालीय. जगदीश शेट्टींचे नितेश राणेंसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ईशान्य मुंबई दत्ता दळवी आणि जगदीश शेट्टी-दीपक सावंत यांच्यात अंतर्गत वाद सुरु होता. शेट्टी यांच्याकडे दळवींविरोधात ऑडिओ क्लिपचे काही पुरावे होते. याच वादातून माजी महापौर दत्ता दळवींनी विभागप्रमुख पदाचा राजीनामाही दिला होता.

माजी महापौरांचा राजीनामा

दरम्यान, शिवसेनेच्या ईशान्य मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांमध्ये गटबाजी उफाळून आली असतानाच, मुंबईचे माजी महापौर आणि ईशान्य मुंबई विभाग क्रमांक ७ चे विभागप्रमुख दत्ता दळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केलाय. शिवसेनेच्या मुखपत्रात ईशान्य मुंबईतील पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका आज जाहीर करण्यात आल्यात. त्यात दत्ता दळवी यांनी वैयक्तिक कारणांमुळं स्वतःच्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती देण्यात आलीय.