मुंबई : मित्रपक्ष असलेल्या भाजपला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत बसल्यापासून शिवसेना आणि पर्यायाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेकदा टीका करण्यात आली. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासोबत तडजोड केल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले. ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, असंही म्हटलं गेलं. या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी पुराव्यानिशि उत्तर दिलंय. (uddhav thackeray give rebuttal to opposition who allegations on chief minister to quit hindutva for power compromise)
"ही बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी बातमी पसरवणं आता आली. एकट्याच्या ताकदीवर 2014 मध्ये 63 आमदार शिवसेनेचे आमदार निवडून आले ती पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची पण मधल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेने",असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळेस ते बोलत होते.
धक्का हो धक्का. सत्तेसाठी एकत्र आलो. सकाळी कमलनाथ पवारांचा विश्वास. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला.कुऱ्हाडीची गोष्ट. ज्याने घाव घातल्या जाताहेत त्याच्या वेदना अधिक. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी.
एकदा ठरवू या समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असे ठेवा.