'उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री, तर आदित्य ठाकरेंनी कॅबिनेट मंत्री व्हावं'

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार का ?

Updated: Oct 28, 2019, 04:44 PM IST
'उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री, तर आदित्य ठाकरेंनी कॅबिनेट मंत्री व्हावं' title=

मुंबई : भाजपला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं तर आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री व्हावं. अशी इच्छा शिवसैनिकांनी बोलून दाखवली आहे. आतापर्यंत ठाकरे घराण्यातील व्यक्तीनं कुठलंच राजकीय पद घेतलेलं नाही. पण यावेळी मुख्यमंत्रीपद ठाकरे घराण्यात यायलाच हवं अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढवणारे पहिले व्यक्ती आहे. ज्यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय ही मिळवला. निवडणुकीच्या आधीच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी प्रोजेक्ट केलं जात होतं.

भाजप मुख्यमंत्रीपद सहज देणार नाही हे शिवसेनेला माहित होतं. पण आता विधानसभेचा निकाल असा लागला आहे की, शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहे. त्यामुळे शिवसेनेचा भाव वाढला आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदावर आधीपासूनच दावा केला जात आहे. युतीचा निर्णय घेताना अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय ठरलं याबाबत कोणतीही माहिती बाहेर आली नाही. ५०-५० चा फॉर्म्युला ठरला असला तर मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही भूमिका मतदानाच्या आधी मांडली गेली नाही.

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं म्हणून शिवसैनिकांकडून जोरदार मागणी होत आहे. पण अनुभवाचा विचार केला तर आदित्य ठाकरे यांच्याकडे तसा राजकीय अनुभव कमी आहे. आदित्य़ ठाकरे हे अभ्यासू नेते आहेत. ते पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेले आहेत आणि पहिल्यांदा आमदार झाले आहेत. पण राजकीय अनुभव कमी असल्याने त्यांना मुख्यमंत्री केल्याने राज्यात मतदार नाराज होऊ शकतो. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं म्हणून मागणी होऊ लागली आहे.