Amit Shah यांच्या मुंबई दौऱ्यात आलेला 'तो' संशयीत व्यक्ती कोण?

Amit Shah यांच्या Mumbaiदौऱ्यासंदर्भात धक्कादायक खुलासा!

Updated: Sep 8, 2022, 10:15 AM IST
Amit Shah यांच्या मुंबई दौऱ्यात आलेला 'तो' संशयीत व्यक्ती कोण? title=
Treading News security breach during Minister Amit Shah Mumbai Visit

Amit Shah: आताची सर्वात मोठी बातमी. केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांच्या Mumbaiदौऱ्यासंदर्भात धक्कादायक खुलासा झाला आहे. अमित शाहांच्या (Amit Shah) मुंबई (Mumbai) दौऱ्यायादरम्यान सुरक्षेत चूक झाल्याची माहिती समोर आलीय. शाहांच्या दौऱ्या दरम्यान एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत होती.

दौऱ्यात असणारा 'तो' व्यक्ती कोण? 

हेमंत पवार असं या तरुणाचं नाव असून, तो धुळ्याचा रहिवासी आहे. हेमंत पवारने (Hemant Pawar) आंधप्रदेशमधील खासदाराचा सचिव (impersonating PA of an MP from Andhra Pradesh) असल्याचं सांगून अमित शाहा यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला (person roaming around shah). त्याच्या वागणुकीवर मंत्रालयातील अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तातडीने मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. 

त्यानंतर पोलिसांनी हेमंत पवारला ताब्यात घेतलंय. हेमंत पवार हा कशासाठी तिथे आला होता, अमित शहा यांच्याजवळ जाण्याचे कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान हेमंत पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घराबाहेरही फिरत असल्याचं दिसून आला आहे. हेमंत पवारला 5 दिवसांची पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.