मराठा मोर्चासाठी मुंबईत अशी असणार वाहतुकीची व्यवस्था

  ९ ऑगस्टला काढण्यात येणा-या मराठा मोर्चासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या व्यवस्थापनाची तयारी केली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टमधील मोकळ्या जागेत पार्कींगचा व्यवस्था करण्यात आली आहे.

Updated: Aug 8, 2017, 09:19 PM IST
मराठा मोर्चासाठी मुंबईत अशी असणार  वाहतुकीची व्यवस्था title=

मुंबई :  ९ ऑगस्टला काढण्यात येणा-या मराठा मोर्चासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या व्यवस्थापनाची तयारी केली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टमधील मोकळ्या जागेत पार्कींगचा व्यवस्था करण्यात आली आहे.

- वाशी मार्गे येणारी वाहनं खाडीपूल टोलनाका ते शिवाजी पुतळा(पांजरपोळ) 

- चेंबुरहुन सुमन जंक्शन येथून डावे वळण घेऊन मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील वाहनतळावर येतील

- ठाणेमार्गे येणारी वाहनं पूर्व द्रुतगतीमार्गे सुमन नगरमधून डावे वळण घेऊन मुंबई पोर्ट ट्रस्ट वाहनतळावर येतील

- पश्चिम उपनगरातून येणारी वाहने सांताक्रुझ-चेंबुर लिंक रोडमार्गे अमरमहल जंक्शन येथून सुमन नगरमधून डावे वळण घेऊन पोर्ट ट्रस्टला येतील

- पश्चिम उपनगरातून येणारी वाहन कलानगर, टी. जंक्शन धारावीमार्गे सायन रेल्वे स्टेशन येथून पुढे डावे वळण घेवून सुमन नगर येथून यु टर्न घेवून डावे वळण घेऊन पोर्ट ट्रस्ट वाहनतळावर येतील

मोर्चाच्या नियमनासाठी कुठले रस्ते बंद 

- डॉ. आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जे.जे. उड्डाणपुल सुरु होईपर्यंतची दक्षिण वाहीनी सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीसाठी बंद राहील.
 
- यातून अग्नीशामक, पोलीस, अॅम्ब्युलन्स आणि अत्यावश्यक वाहने वगळण्यात आलेली आहेत. 

- जे. जे. उड्डाणपुलावरून छ. शिवाजी महाराज टर्मिनल जंक्शनपर्यंत दक्षिण आणि उत्तर वाहिन्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहतील. 

- आझाद मैदानाशेजारील ओ. सी. एस जंक्शन ते सीएसएमटी जाणारा हजारीमल सोमानी मार्ग दक्षिण व उत्तर वाहीनी वाहतुकीस बंद राहील. 

- मेट्रो जंक्शन ते महानगर पालिका मार्ग दक्षिण व उत्तर वाहीनी वाहतुकीस बंद राहील 

- भाटीया बाग ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शनकडे येणारे उजवे वळण बंद राहील.

- कर्नाक बंदर जंक्शनकडून कर्नाक ब्रिजकडे जाण्यासाठी वाहनांना प्रतिबंध राहील

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

- किंग्ज सर्कलकडून डावे वळण घेवून चार रस्त्याने पी.डी. मेलो रस्ता 

- दादर टी.टीपासून डावे वळण घेवून चार रस्ता 

- नायगाव क्रॉसरोडला डावे वळण धेवून आर. ए. के. चार रस्ता

- ग. द. आंबेकर मार्गे माने मास्तर चौक ते आर ए. के. चार रस्ता 

- मादाम कामा रोडवरून हुतात्मा चौक येथे उजवे वळण घेवून काळाघोडा मार्गे ओल्ड कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग

- एन. एम. जोशी मार्ग ते लोअर परेल रेल्वे स्टेशन ते वरळी नाका मार्गे हाजीअलीकडे जाणारा रस्ता 

- एन. एस. रोड (मरीन ड्राईव्ह)वरून पेडर रोड हाजीअली मार्गे सी-लिंक किंवा ई मोजेस रोडवरून सिद्धीविनायक ते सेनाभवन मार्ग