मराठा मोर्चाच्या आंदोलनकांशी सरकारचा चर्चेचा प्रयत्न

मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सराकरकडून आंदोलनकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र अजून तरी मराठा क्रांती मोर्चाकडून चर्चेबाबत सरकारला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. 

Updated: Aug 8, 2017, 09:19 PM IST
मराठा मोर्चाच्या आंदोलनकांशी सरकारचा चर्चेचा प्रयत्न title=

मुंबई : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सराकरकडून आंदोलनकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र अजून तरी मराठा क्रांती मोर्चाकडून चर्चेबाबत सरकारला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. 

उद्या मुंबईत मराठा क्रांती मोर्चा निघणार असून अद्याप सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा झालेली नाही. त्यामुळे मोर्चापूर्वी सरकारची आंदोलनकांबरोबर चर्चा होणार का याबाबत प्रश्नचिन्हं आहे.