नवी मुंबईत दोन तृतीय पंथ गटात हाणामारी; Video Viral

(social Media) सोशल मीडियावर हल्ली Free Style हाणामारीचे बरेच व्हिडीओ समोर येत आहेत. पतीला पत्नीनं दुसऱ्याच महिलेसोबत पाहिल्यानंतरची हाणामारी, रेल्वेमध्ये महिलांची हाणामारी, रस्त्यावर तरुणींची हाणामारी वगैरे वगैरे. 

Updated: Oct 28, 2022, 09:30 AM IST
नवी मुंबईत दोन तृतीय पंथ गटात हाणामारी; Video Viral  title=
transgender fight in two groups kharghar sector 12 on bhaubeej viral video latest marathi news

Viral Video : (social Media) सोशल मीडियावर हल्ली Free Style हाणामारीचे बरेच व्हिडीओ समोर येत आहेत. पतीला पत्नीनं दुसऱ्याच महिलेसोबत पाहिल्यानंतरची हाणामारी, रेल्वेमध्ये महिलांची हाणामारी, रस्त्यावर तरुणींची हाणामारी वगैरे वगैरे. आता यामध्ये हाणामारीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा Video नवी मुंबईतील (Navi Mumbai kharghar) खारघर सेकटर 12 मधील असून, इथं भाऊबीजेच्या दिवशी दोन तृतीय पंथ गटात तुफान हाणामारी  झाली होती. 

(bhai dooj 2022) भाऊबीजेच्या दिवशी खारघरमध्ये  घरोघरी भाऊबीज भेटीची मागणी करत असताना बोगस तृतीय पंथाचा (transgender) वेष परिधान करून पैशांची मागणी करीत असल्याचे तिघा तृतीय पंथच्या गटाच्या निदर्शनास आलं. 

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्या तिघांनी बोगस तृतीय पंथ व्यक्तीला कपडे उतरवून बेदम मारहाण केली. यावेळी परिसरातील बघ्यांची गर्दी झाली होती. भांडण थांबत नसल्याने शेवटी  खारघरमधील पोलीस ठाण्यात संपर्क साधून तृतीय पंथियांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. 

Viral Video : रेड्यांचा प्रहार, झुंजीचा थरार, रेड्यांच्या झुंजीचा व्हीडिओ व्हायरल

हे प्रकरण अद्यापही पोलिसांच्या अख्त्यारित असलं तरीही इथं लक्ष देण्याची बाब म्हणजे सणासुदीच्या दिवसांमध्ये अनेकदा याचक आपल्या दारी येतात. किंवा वाटेवर आपल्यापुढे हात पसरून मदतीसाठी आर्जव करतात. पण, बऱ्याचदा त्यांचा हा पसवा चेहरा मात्र आपल्या लक्षात येत नाही. काही ठिकाणी वेश धारण करुन आलेल्या अनेकांकडून चोरीमारीसारखी कृत्यही घडल्याची प्रकरणं आतापर्यंत समोर आली आहेत. त्यामुळं याबाबत सतर्क राहणं कधीही उत्तम.