मुंबई : एकीकडे कार्यालयं आणि सार्वजनिक ठिकाणी नवमातांना बाळाला दूध पाजण्यासाठी विशेष कक्ष स्थापन केले जात आहे. तर दुसरीकडे मात्र गाडीमध्ये स्त्री बाळाला स्तनपान करताना, गाडीच टोईंग केल्याची घटना घडली आहे.
शनिवारी ज्योती माळे आपल्या सात महिन्याच्या बाळासोबत प्रवास करत होती. प्रवासादरम्यान बाळाला भूक लागल्याने आणि त्याने रडायला सुरूवात केल्याने चालू गाडीमध्ये तिने स्तनपान दिले. पण बाळाची रडारड थांबत नव्हती म्हणून तिने ड्रायव्हरला गाडी रस्त्याच्या कडेला लावयला सांगितली. चुकीने ड्रायव्हरनेदेखील गाडी नो पार्किंग भागात लावली. अशावेळी तेथे ट्राफिक विभागाचे पोलिस आले आणि त्यांनी गाडी हटवण्यास सुरूवात होती. हा प्रकार एका व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. तसेच तो व्हिडिओ सोशल मीडियावरही झपाट्याने व्हायरल होत आहे.
मालाड एस. व्ही. रोड परिसरात हा प्रकार घडला. व्हायरल झाल्याला व्हिडिओतील पोलिस कॉन्टेबलला ओळखण्यात आले आहे. शशांक राणे असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव असून त्यांना बडतर्फ करून पुढील चौकशी केली जाईल अशी माहिती जॉईंट कमिशननर ऑफ पोलिस ( ट्राफिक विभाग) अमितेश कुमार यांनी दिली आहे.