मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी...

अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या लांबचलांब रांगा..    

Updated: Mar 8, 2020, 10:28 AM IST
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी...  title=

मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनधारकांना सकाळीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झालं. अमृतांजन ब्रीजजवळ तीनही लेनवर वाहनांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या होत्या. अगदी धीम्यागतीने वाहतूक सुरू असल्याने वाहनधारकांसाठी थांबून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. सुमारे दोन ते तीन किलोमीटर वाहतुकीची कोंडी झाली होती.

शनिवार आणि रविवार असल्यामुळे अनेक जण बाहेर फिरायला निघतात. सुट्ट्यांमुळे पर्यटक पुणे, लोणावळा, खंडाळा या ठिकाणी फिरायला येत असल्यानं, सकाळपासूनच मुंबई-पुणे एक्स्प्रेवरवर वाहतूक कोंडी झाली होती.

त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक देखील खोळंबली आहे. पर्यटकांची गर्दी त्याचप्रमाणे बेशिस्त वाहनचालकांचा फटकाही पर्यटकांना बसतो. अठवडाभर काम केल्यानंतर काही वेगळ अनुभवण्यासाठी प्रत्येक जण बाहेर जाण्याचा बेत आखतो.

पण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना त्याचप्रमाणे वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागतं. सुट्टीच्या दिवशी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळतेय.