रक्षाबंधनापूर्वी सोन्याच्या भावाविषयी मोठी 'घडामोडं', सोनं आता...

पाहा सोन्याचे मागील १० दिवसाचे भाव कसे खाली वर झाले.

Updated: Aug 23, 2018, 08:43 PM IST
रक्षाबंधनापूर्वी सोन्याच्या भावाविषयी मोठी 'घडामोडं', सोनं आता... title=

मुंबई : सोन्याचे भाव १३ ऑगस्टनंतर घसरायला सुरूवात झाली होती, १३ ऑगस्ट २०१८ रोजी, मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत, प्रति १० ग्रॅम ३१ हजार ८६० रूपये होती. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत, प्रति १० ग्रँम २९ हजार १५० रूपये होती. यानंतर सोन्याच्या भावात घसरण सुरू झाली. शनिवार १८ ऑगस्ट २०१८ रोजी २४ कॅरेटसाठी, सोन्याचा भाव रूपये ३० हजार ८७० वर आला, तर त्या दिवशी सोन्याचा २२ कॅरेटसाठी होता, रूपये २८ हजार ८७०. (खाली पाहा सोन्याचा आजचा भाव)

यानंतर आज पुन्हा सोन्याला झळाळी आली आहे. १३ ऑगस्टनंतर सोन्याचे जे भाव खाली आले होते, ते १० दिवसापूर्वीच्या सोन्याच्या भावपर्यंत येऊन पोहोचले आहेत. सोन्यात यापूर्वी गुंतवणूक ज्यांनी केली आहे, त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे.

आज गुरूवार २३ ऑगस्ट २०१८ रोजी सोन्याचा २४ कॅरेटसाठी, प्रति १० ग्रॅमसाठी भाव आहे, रूपये ३१ हजार, तर २२ कॅरेटसाठी सोन्यासाठी आहे, रूपये २९ हजार. खाली पाहा सोन्याचे मागील १० दिवसाचे भाव कसे खाली वर झाले.

सोन्याचे मागील १० दिवसांचे भाव | सोन्याचे प्रति १० ग्रॅमचे भाव

सोमवार १३ ऑगस्ट २०१८

२४ कॅरेटसाठी, रूपये ३१ हजार ८६० | २२ कॅरेटसाठी, रूपये २९ हजार १५०

मंगळवार १४ ऑगस्ट २०१८

२४ कॅरेटसाठी, रूपये ३० हजार ०२० | २२ कॅरेटसाठी, रूपये २९ हजार ०२०

बुधवार १५ ऑगस्ट २०१८ 

२४ कॅरेटसाठी, रूपये ३० हजार १०० | २२ कॅरेटसाठी, रूपये २९ हजार १५०

गुरूवार १६ ऑगस्ट २०१८ 
२४ कॅरेटसाठी, रूपये ३० हजार ००० | २२ कॅरेटसाठी, रूपये २९ हजार ०२०

शुक्रवार १७ ऑगस्ट २०१८ 
२४ कॅरेटसाठी, रूपये ३१ हजार ००० | २२ कॅरेटसाठी, रूपये २८ हजार ७६०

शनिवार १८ ऑगस्ट २०१८ 
२४ कॅरेटसाठी, रूपये ३० हजार ८७० | २२ कॅरेटसाठी, रूपये २८ हजार ८७०

रविवार १९ ऑगस्ट २०१८ 
२४ कॅरेटसाठी, रूपये ३० हजार ८८० | २२ कॅरेटसाठी, रूपये २८ हजार ८८०

सोमवार २० ऑगस्ट २०१८ 
२४ कॅरेटसाठी, रूपये ३१ हजार ८६० | २२ कॅरेटसाठी, रूपये ३१ हजार ८६०

मंगळवार २१ ऑगस्ट २०१८ 
२४ कॅरेटसाठी, रूपये ३० हजार ८५० | २२ कॅरेटसाठी, रूपये २८ हजार ८७०

बुधवार २२ ऑगस्ट २०१८ 
२४ कॅरेटसाठी, रूपये ३० हजार ९६० | २२ कॅरेटसाठी, रूपये २८ हजार ९८०

गुरूवार २३ ऑगस्ट २०१८ 
२४ कॅरेटसाठी, रूपये ३१ हजार ००० | २२ कॅरेटसाठी, रूपये २९ हजार ०००