डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सर्व महिला आरोपी डॉक्टरांना अटक

तिसऱ्या महिला आरोपीला पुण्यातून अटक

Updated: May 29, 2019, 11:41 AM IST
डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी सर्व महिला आरोपी डॉक्टरांना अटक title=

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तीनही महिला डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल आणि हेमा अहुजा असं अटक करण्यात आलेल्या महिला डॉक्टरांची नावं आहेत. हेमा अहुजाला काल रात्री अटक करण्यात आली होती. तर भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल हिला सत्र न्यायालयातून अटक करण्यात आली आहे.

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभाग प्रमुख, मार्डचे सदस्य, पदाधिकारी, महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जबाब नोंदवण्यासाठी आग्रीपाडा अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेतले आहे. या वेळी तीन संशियांतापैकी एक असलेल्या डॉ. भक्ती मेहेर हिला देखील पोलिसांनी अटक करून चौकशी सुरू केली. दरम्यान संपूर्ण प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे.

पायल तडवी आत्महत्या प्रकरणात भीम आर्मीने देखील उडी घेतली आहे. न्यायासाठी आवाज उठवत भीम आर्मीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.