Mumbai Local Train | कोरोनाचा पहिला डोस घेतलेल्यांनाही लोकल प्रवासाची परवानगी मिळणार का?

कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या लसवंतांना रेल्वे प्रवासाची (Mumbai Local Railway)  परवानगी देण्यात आलेली आहे.

Updated: Aug 17, 2021, 05:17 PM IST
Mumbai Local Train | कोरोनाचा पहिला डोस घेतलेल्यांनाही लोकल प्रवासाची परवानगी मिळणार का? title=

मुंबई : कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लसवंतांसाठी लोकल रेल्वे (Mumbai Local Train) अखेर ट्रॅकवर आली आहे. सर्वसामांन्यांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवागनी देण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी मासिक पास काढले आहेत. सलग 3 दिवस जोडून सुट्ट्या आल्याने खऱ्या अर्थाने आजपासून (17 ऑगस्ट) लोकल गजबजली आहे. लसवतांच्या प्रवासानंतरही जर लोकलमधील गर्दी नियंत्रणात राहिली, तर कोरोनाचा पहिला डोस घेतलेल्यांनाही लोकल प्रवास करण्याची सूट देण्याबाबत चर्चा सुरु आहे. (Those who have completed 1 dose of Corona vaccine are also likely be to allowed to travel by Mumbai local train) 

लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटो आयडी पाहून मासिक रेल्वे पास दिले जात आहेत. राज्यात काही ठिकाणी लसींच्या पुरवठ्याअभावी लसीकरण मोहिमेत खंड पडतोय. लसीकरणाच्या मोहिमेत आधी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वरिष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. यानंतर 18 ते 44 या वयोगटातील सर्वांसाठी लसीकरण सुरु करण्यात आले. त्यामुळे या वयोगटातील काहींचा अपवाद वगळता सर्वांचा एक डोस पूर्ण झालेला आहे. त्यामुळे हा वर्ग अजूनही लोकल प्रवासापासून दूरच आहे.  

पुढील 7 दिवसात जर लोकलमधील गर्दी नियंत्रणात राहिली, तर एक डोस झालेल्यांनाही प्रवासाची परवानगी देण्यात यावी, यावर विचार केला जाईल, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून म्हटलं जात आहे. मात्र याबाबत रेल्वेकडून अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाही.

सर्वसामांन्यासाठी लोकल सुरु होण्याआधी दररोज अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी रेल्वे प्रवास करत होते. यामध्ये पश्चिम मार्गावरुन दररोज सरासरी 12 लाख 39 हजार प्रवास करत होते. तर मध्य रेल्वेवरील हाच दररोजचा आकडा 20 ते 22 लाख इतका होता. लोकलमध्ये आजपासून लसवंत प्रवास करणार आहेत. त्यामुळे किती जणांनी लोकल प्रवासाचा लाभ घेतला, ही आकडेवारी लवकरच समोर येईल. त्या आकडेवारीवरुन एक डोस झालेल्यांचं लोकल प्रवासाचं भवितव्य ठरेल.