...तर एकाच दिवशी होणार मुकेश अंबानींच्या मुला-मुलीचे लग्न

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात सध्या लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. मार्चमध्ये अंबानी यांचा मुलगा आकाशचे लग्न श्लोका मेहतासोबत ठरले. 

Updated: May 7, 2018, 12:59 PM IST
...तर एकाच दिवशी होणार मुकेश अंबानींच्या मुला-मुलीचे लग्न title=

मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात सध्या लग्नाची तयारी जोरदार सुरु आहे. मार्चमध्ये अंबानी यांचा मुलगा आकाशचे लग्न श्लोका मेहतासोबत ठरले. दोघांती प्री एंगेजमेंट पार्टीही ठेवण्यात आली होती. आकाशचे लग्न डिसेंबरमध्ये ठरलेय. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या लग्नाचे सेलिब्रेशन ८-१२ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेय. मुंबईत त्यांचे लग्न होणार आहे. ही बातमी येते न येते तोच अंबानी कुटुंबातील लाडकी मुलगी ईशा अंबानीही लग्नबंधनात अडकतेय. ईशा तिचा जुना मित्र आनंद पिरामलशी विवाहबद्ध होणार आहे. हे दोघंही डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जातेय. त्यामुळे आकाश आणि ईशा या दोघा भावा-बहिणींचे लग्न एकाच दिवशी एकाच ठिकाणी होणार असल्याचे बोलले जातेय. दरम्यान, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

डिसेंबरमध्ये होणार लग्न

ईशा अंबानीला पिरामल ग्रुपचा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आनंद पिरामलने रविवारी महाबळेश्वरमधील मंदिरात प्रपोज केले. यानंतर प्रेस रिलीजद्वारे या दोघांनी एंगेज होत असल्याची माहिती दिली. यानंतर मुकेश अंबानीचे कुटुंब आपला जावई आनंद पिरामलसोबत मुंबईच्या इस्कॉन मंदिरात गेले. येथे ईशा आणि आनंद यांनी पूजा केली आणि आशीर्वाद घेतले. 

एकाच दिवशी होणार आकाश-ईशाचे लग्न

आकाश आणि ईशाचे लग्न एकाच दिवशी होण्यामागे कारण आहे. खरंतर, ईशा आणि आकाश जुळे भाऊ-बहीण आहेत. ईशा फक्त सात मिनिटांनी आकाशपेक्षा लहान आहे. मात्र दोघांचा जन्म एकाच दिवशीचा आहे. जन्म, संगोपन, बिझनेसनंतर या दोघा भाऊ-बहिणींचे लग्न एकाच दिवशी होणार असल्याचे बोलले जातेय. आकाश आपली गर्लफ्रेंड श्लोक मेहतासोबत डिसेंबरमध्ये लग्न करणार तर ईशा याच महिन्यात बॉयफ्रेंड आनंद पिरामलसोबत लग्नबंधनात अडकेल.

ग्रँडवेडिंग

सूत्रांच्या माहितीनुसार, अंबानी कुटुंब लग्नाच्या जोरदार तयारीला लागलेय. अद्याप कोणाच्याही लग्नाची तारीख स्पष्ट झालेली नाही. मात्र जेव्हा ही तारीख ठरेल तेव्हा भारतातील ग्रँड वेडिंग असेल. मुंबईच्या ऑबेरॉय हॉटेलमध्ये लग्नाचा समारंभ आयोजित केला जाऊ शकतो.