अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : गेल्या पाच वर्षात मुंबईत महापालिकेने पुलांची जी काम केली, त्याची कॅग मार्फत तपासणी करण्यात येणार आहे. नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली आहे. सीएसटी स्थानकावजवळील हिमालय पूल कोसळला होता. त्यावर धनंजय मुंडे यांनी प्रश्न विचारला असता त्यावर योगेश सागर यांनी ही घोषणा केली.
दरम्यान या प्रकऱणात आरोपी जरी अटकेत असले तरी संबंधित उपायुक्त यांच्यावर कारवाई केली जाणार का असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. तेव्हा कोणाला पाठिशी घालण्याचा प्रश्नच येत नाही, जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
या प्रकरणात मुख्य अभियंता आणि उपायुक्त दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करू असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आता पूल लवकरात लवकर बांधण्याबाबत IIT मुंबईकडून तंत्रज्ञान प्राप्त झाले आहे. तसंच पुलांबाबत, ऑडिट करण्याबाबत नवीन मानके तयार करून याबाबत थर्ड पार्टी ऑडिट केलं जात असल्याचंही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे.