दीपक भातुसे, मुंबई : कोरोनाचा कहर सुरु असतानाच म्युकरमाकोसिसचे रुग्ण देखील वाढू लागले आहेत. पण म्युकरमाकोसिसच्या रुग्णांवर उपचारासाठी लागणारे इंजेक्शन उपलब्ध होत नाहीये. राज्यात म्युकरमायकोसिसवरील अम्पोटेरेसिन इंजेक्शन्सचा (amphotericin B) तुटवडा आहे. (shortage of mucormycosis injections)
राज्यात दररोज 20 हजार इंजेक्शन्सची गरज आहे. तर केंद्राकडून 5 हजार इंजेक्शन्सचा पुरवठा होत आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यात एक जून रोजी म्युकरमायकोसिसचे (mucormycosis patients) 3914 रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 421 रुग्णांचा मृत्यू झालाय. म्युकरमाकोसिसचे (Black Fungus) सगळ्यात जास्त रुग्ण नागपूर जिल्ह्यात आहेत. नागपूर जिल्ह्यात 1059 रुग्ण आहेत. त्याखाली पुण्यात 758 रुग्ण, तर औरंगाबादमध्ये 571 रुग्ण आहेत
दुसरीकडे राज्यात रेमडेसेवीर इंजेक्शन्सचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे. राज्यात 3 लाख रेमडेसेवीर इंजेक्शन्सचा साठा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यात कोरोनाचे 2 लाख 53 हजार 367 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. कोरोनाच्या अती गंभीर रुग्णांची संख्या कमी असल्याने रेमडेसेवीर इंजेक्शन्सची मागणी घटली आहे, तर दुसरीकडे त्याचा पुरवठा वाढला आहे.