मेट्रो तीनच्या प्रशासानाला न्यायालयाने पुन्हा फटकारले

मेट्रो तीनच्या प्रशासानाला आज उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा फटकारले. 

Updated: Nov 9, 2017, 06:09 PM IST
मेट्रो तीनच्या प्रशासानाला न्यायालयाने पुन्हा फटकारले title=

मुंबई : मेट्रो तीनच्या प्रशासानाला आज उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा फटकारले. रात्रीचं काम बंद झालं नाही, तर मात्र संपूर्ण काम बंद करण्याचे आदेश द्यावे लागतील, असा इशाराच आज हायकोर्टानं मेट्रो तीनच्या प्रशासानाला दिला.

 मेट्रो तीनचे काम रात्री बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पण याचिकाकर्त्यांनी रात्रीही काम सुरुच असल्याची तक्रार केली. त्यावर कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली.  काम सुरू असताना आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होत असल्याचं मेट्रोचे काम रात्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

आमच्या आदेशानंतरही जर मेट्रो तीनचे काम रात्री सुरू असेल तर आम्हाला संपूर्ण मेट्रो तीनचे काम थांबविण्याचाच आदेश द्यावा लागेल, असा मुंबई हायकोर्टाने मेट्रो प्रशासनाला इशारा दिलाय. आदेशाचं पालन होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला.

मेट्रो तीनचे रात्री काम सुरू असल्याने त्याचा आजूबाजूच्या रहिवासीयांना त्रास होत असल्याच्या याचिकेवर कोर्टाने रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत काम न करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे याचिकाद्वारे लक्षात आणून दिले. त्यानंतर कोर्टाने पुन्हा मेट्रो तीनला चांगलेच फटकारले.