मुंबई : राज्यमंत्रीमंडळाच्या विस्तार आणि फेरबदलाच्या घडामोडींना आता वेग आला आहे. ऑक्टोबरमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेनेनं १ कॅबिनेट मंत्रीपद मागितल्याची सूत्रांची माहिती आहे.
ज्या भागात भाजपचे मंत्री नाहीत, त्याभागातले मंत्री होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक समतोल साधण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असणार आहे. शिवाय भाजपच्या कोट्यातले तीन ते चार मंत्री बदलले जाण्याचीही शक्यता आहे.