मुंबई : कोरोनाला घाबरु नका,असं आवाहन सगळेच अधिकारी करत असताना अनेक वृद्धांच्या मनात कोरोनाविषयी मनात भीतीचं वातावरण आहे. कोरोनामुळे आजकाल सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. वयोवृध्द माणसं कोरोनामुळे मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जास्त आहे. मात्र भीतीला चुटकीसरशी दूर करत राज्यभरात अनेक आजीबाईंनी एक संदेश समाजाला दिलाय. मुंबईसह जालन्यातील आजीबाईंनी कोरोनावर यशस्वी मात करत दोन हात करता येऊ शकतात हे दाखवून दिलंय.
मुलुंडमधल्या एका ९६ वर्षांच्या आजींनी कोरोनावर आश्चर्यकारकरित्या मात केली. मालती दुर्वे या आजींनी २२ दिवस कोरोनाला झुंजवलं. त्यांच्या फुप्फुसांचं ४५ टक्के नुकसान झालं होतं. त्यांना न्युमोनियादेखील झाला होता. १९ दिवस दुर्वे आजी आयसीयू होत्या तर मात्र त्यातून त्या यशस्वीरित्या बाहेर पडल्या. आजींच्या कोरोना लढ्यानं सर्वांनाचं अचंबित केलं.
जालन्यातील एका १०८ वर्षाच्या आजीसह याच आजीच्या ७८ वर्षाच्या मुलीने कोरोनाला धोबीपछाड देत कोरोनावर मात केलीय. गयाबाई चव्हाण असे या आजीचे नाव आहे. आजी आता फार काळ आपल्यात राहणार नाही याची भीती कुटुंबातील सदस्यांना वाटत होती. पण या वयात एकही आजार नसल्यानं गयाबाई यांनी थेट कोरोनाशी दोन हात करत त्यावर मात केली.